Tuesday, April 30, 2024

/

मराठा प्राधिकरणाची भीक नको आरक्षण द्या-

 belgaum

मराठा विकास प्राधिकरण असो किंवा लिंगायत विकास प्राधिकरण असो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने चालविलेली ही चाल आहे, आम्हाला मराठा विकास प्राधिकरणाची भीक नको, अशा खड्या शब्दात आज आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सरकारवर निशाणा साधला. धारवाड येथे मराठा समाजाची राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होती, यावेळी प्रासारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर आरोप केला आहे.

बेळगावातून या मेळाव्यात भाजप नेते किरण जाधव,मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक गुणवंत पाटील, रवी कोकीतकर,सुनील जाधव आदी सहभागी झाले होते.

मराठा समाजाला २ए श्रेणीत समाविष्ट करण्यासाठी मराठा समाजाने मागणी केली आहे. या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्याही प्राधिकरणाची गरज नाही. सरकारने घोषणा केलेल्या ५० कोटींची नव्हे तर ५०० कोटींच्या भिकेचीही मराठा समाजाला गरज नाही. आम्हाला केवळ ३बी श्रेणीतून २ए श्रेणीत समाविष्ट करावे, इतकीच मागणी आम्ही केलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या प्राधिकरणाची केवळ घोषणा केली आहे तसेच ५० कोटींच्या निधीचीही केवळ घोषणा केलेली आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. निवडणुकांना सामोरे ठेऊन सरकारने जनतेसमोर चालविलेली ही केवळ चाल आहे, असा आरोप अंजलीताई निंबाळकर यांनी केला आहे.

 belgaum

Anjli nimbalkar

मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारने या निवडणुकीच्या आधी विचार करून आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यात लाखो मराठा समाजाचे नागरिक आहेत. केवळ ५० कोटींच्या अनुदानातून मराठा समाजाचा विकास होणे शक्य नाही. या ५० कोटींच्या अनुदानातून मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही. आम्हाला अनुदान नको तर आरक्षण हवे आहे. आजपर्यंत सरकार केवळ आश्वासनेच देत आले आहे. परंतु एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही, असाही आरोप अंजलीताई निंबाळकर यांनी केला.

बेळगाव मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक गुणवंत पाटील यांनी प्राधिकारणाने दिलेले 50 कोटींचे 500 कोटी कसे शासना कडून मिळवून घेता येतील याचा विचार मराठा समाजाने करावा असे मत मांडले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.