Saturday, April 27, 2024

/

किणये भागांत मंदिरात वाढले चोरीचे प्रकार

 belgaum

बेळगाव जांबोटी रोड वरील कुसमळी (ता खानापूर)गावाजवळ असलेल्या काळम्मा मंदिरातील साहित्याची चोरी करण्यात आली आहे. शनिवारी रोजी मध्यरात्री च्या सुमारास ही घटना घडली असून रविवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली आहे.

गावातून मिळालेल्या माहितीनुसार या चोरीमध्ये चोरट्यानी जवळपास 50 हजारांचा एवज लांबविला आहे. यामध्ये चार मोठ्या घंटा , तीन लहान घंटा, एक मोठी समय आणि शिव पिंडी वरील चांदीचे मुकुट असा एवज चोरीला गेला आहे.

बेळगाव चोर्ला मार्गाला लागून काळम्मा मंदिर हे असून कुसमळी गावापासून दूरवर आहे. त्या मुळे रात्रीच्या वेळी तिथे जास्त प्रमाणात लोकांची वर्दळ नसते. शनिवारी रात्री चोरी झाली त्यानंतर रविवार सकाळी काही तरुण फिरावयास गेले असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर जांबोटी पोलिसांना कळविण्यात आले.

 belgaum

किणये परिसरात गेल्या चार दिवसात 3 चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत 2 तर खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक चोरीची घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.