Friday, December 27, 2024

/

“ही” गटार बनली आहे धोकादायक, शिवाय रस्त्याचीही झाली आहे दुर्दशा!

 belgaum

शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील शांती कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून येथील गटारीचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे हे गटार ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील शांती कॉलनीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गटारीचे बांधकाम गेल्या बऱ्याच दिवसापासून अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या गटाराच्या सिमेंट काँक्रीटमधील लोखंडी बार खुले सोडण्यात आले आहेत. गटाराच्या काठाने वर डोकावणारे 3 -4 इंच उंचीचे हे टोकदार बार सध्या धोकादायक ठरत आहेत.

या रस्त्यावर पथदीपांची सोय असली तरी त्यांचा उजेड पुरेसा पडत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी हे गटार ओलांडताना टोकदार लोखंडी बार लागून पाय जायबंदी होण्याच्या घटना घडत आहेत. एकंदर या मार्गावरील रहिवाशांना सदर गटारावरून ये-जा करताना मोठी जोखीम पत्करावी लागत आहे. शांती कॉलनी कडे जाणारा सदर रस्ता आहे अत्यंत खराब झाला आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. परिणामी या रस्त्याची चाळण झाली असून पावसामुळे ठिकाणी तळी साचली आहेत. परिणामी चिखलाने माखलेल्या या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना विशेषकरून दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तेंव्हा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संबंधित अभियंत्यानी याकडे तात्काळ लक्ष देऊन कंत्राटदाराला उपरोक्त गटारीचे अर्धवट अवस्थेतील बांधकाम व्यवस्थित पूर्ण करण्याचा आदेश द्यावा. तसेच रस्त्याचीही दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.