बेळगाव शहरातील शास्त्रीनगर येथील नवव्या क्रॉस जवळ मध्यरात्री अजगर सापडल्याने त्या भागातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे गेल्या पाच दिवसांपासून बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात तो साप वावरत होता त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण होते.
गेल्या दिवसा पासून शास्त्रीनगर भागांतील रहिवाशी वसाहतीत पाणथळ खाली जागेत अजगर साप अडकला होता त्याचा वावर इथे होता त्यामुळे एकच भीती निर्माण झाली होती. सलग चार ते पाच दिवस त्या अजगराचा शोध सुरू होता.जे सी बी पाणी पंप मागवून त्या पाणथळ ठिकाणचे पाणी कमी करून अजगराचा शोध सुरू होता मात्र तो रेल्वे ट्रॅक जवळ सापडला आहे.
अखेर अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर तब्बल १२ फूट लांब आणि ४० किलो वजनाच्या त्या अजगराला सर्पमित्र सामाजिक कार्यकर्ते गणेश दद्दीकर यांनी शोधून काढले.
मंगळवारी मध्यरात्री गुडसशेड रोड जवळील रेल्वे ट्रॅक वर रेल्वे कर्मचाऱ्यांला दिसला त्यावेळी तात्काळ सर्पमित्र गणेश दद्दीकर यांना बोलावण्यात आले त्यांनी त्याला शिताफीने पकडले.सदर साप हा 12 फूट लांब व 40 किलो वजनाचा आहे.
गणेश दद्दीकर यांनी त्या अजगराला आपल्या घरीच ठेवले असून बुधवारी वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.याबद्दल गणेश दद्दीकर यांचे विशेष कौतुक होत आहे.