प्रकाश हुक्केरी यांनी नुकतेच एक आश्चर्यजनक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगावमध्येच कुस्ती खेळणारे भरपूर उमेदवार आहेत, त्यामुळे चिकोडी येथेच कुस्ती खेळा असा सल्ला सतीश जारकीहोळीनीं दिला आहे. प्रकाश हुक्केरी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी असे विधान करणे योग्य नसल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. बेळगावमध्ये खाजगी वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी हि नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकाश हुक्केरी हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. गोकाक मध्ये आपल्या निवासस्थानी प्रतिक्रिया देताना, ते म्हणाले हो चिकोडी मतदार क्षेत्र आपल्यासाठी नेहमीच खुले आहे. या मतदार क्षेत्राला काबीज करण्यासाठी अजूनही ३ वर्षे आहेत. त्यामुळे आता हुक्केरी यांनी चिकोडीत कुस्ती खेळाव असे जारकीहोळी म्हणाले.
एका पक्षात राहून दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देणे योग्य नाही. हुक्केरींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असून जिल्हा पंचायतीपासून सर्व हुद्द्यांवर कार्यरत असणाऱ्या हुक्केरींना मोठा अनुभव आहे. दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या हुक्केरींमुळे काँग्रेसमधील सर्वचजण आश्चर्यचकित झाले असून त्यांच्या ‘त्या’ विधानाबाबत हायकमांड लवकरच याची चौकशी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बेळगावच्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कि उमेदवार निवडीबाबत अजून कोणतीही चर्चा झाली नाही. यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. शिरा, आर आर नगर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मते घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.