सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सिमवासीयांना लिहिलेल्या पाठिंब्याच्या पत्रा नंतर महा विकास आघाडी सरकार मधील आणखी एक जेष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बेळगावातील मराठी जनतेला पाठिंबा दिला आहे.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देखील काळा दिन पाळा असे आवाहन केले आहे.
फेस बुक वरील पोस्ट मध्ये जयंत पाटील असे म्हणाले की
माझ्या सहकाऱ्यांनो,
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्व पदाधिकारी, युवक, युवती, इतर सेल व कार्यकर्त्यांना विनंती आहे की येत्या १ नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्या. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू!
काळ्या दिनाच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रातील मंत्रीचं दंडाला काळ्या फिती बांधून कामकाज करणार नाहीत तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील काळा दिवस पाळून बेळगाव लढ्याला पाठिंबा देणार आहेत.या मुळे पुन्हा एकदा 65वर्षा पासून चाललेल्या या लढ्याची जनजागृती महाराष्ट्रात होणार आहे