बेळगाव तालुक्यातील अनेक तलावांचे खोदाई करण्यात आली आहे तर मार्च अखेरपर्यंत 42 तलाव खोदाई करण्याचे उद्दिष्ट तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ठेवले आहे. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वे करण्यात येत आहे.
पाणी पातळीत वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेवून या कामाला चालना देण्यात आली आहे. यासाठी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी धडपडत आहेत. न्यू वंटमुरी आणि होनगा येथे हे छोटेखानी धरणांची उभारणी करण्यात आली आहे. याच बरोबर इतर भागातही अशीच तलावे निर्माण करून काही ठिकाणी पाणी समस्येवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे मात्र ज्या ठिकाणी तलावांची निर्मिती करण्यात येत आहे त्या परिसरातील सर्वे करून त्याला मंजुरी देण्यात येत आहे. उद्योग खात्री योजनेतून या कामांना गती देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर अधिक निधीचा भार न टाकता ही कामे करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस पाणी पातळीत घट होत असल्याने निसर्गाचे रक्षण करून त्या ठिकाणी पाणी पातळीत वाढ करण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामांना गती देण्यात येत आहे.
या तलावांमधील पाणी शेतकऱ्यांबरोबरच जमिनीमध्ये झिरपते. यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. यांचे योग्य नियोजन करून तलावांची खोदाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वे सुरू असून विविध ठिकाणी पाहणी दौरा काढण्यात येत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जमिनीत पाणी कसे मूरवता येईल याकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे.
आता नुकतीच स्वच्छतागृहांचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी योजना हाती घेण्यात आली आहे. याचबरोबर तलावांच्या माध्यमातूनही ही पाणी जमिनीत झिरपावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठीचा सर्वे सुरू झाला आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये या तलावांची निर्मिती करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.