Thursday, January 9, 2025

/

अपराधी भावना- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

मनुष्य प्रण्याला बुध्दीच्या वरदानाबरोाबरच भीती आणि न्यूनगंड यांचा शाप आहे. त्यातच अपराधीपणा या भावनेला अनेक छटा आहेत.
आपण वागतो आहोत ते चूक की बरोबर, आपण काही वाईट तर वागलो नाही ना? मी असं वागायला नको होतं, असं म्हणायला नको होतं, असं आणि तसं अशी व्दंव्दं आपल्या मनात सारखी चालू असतातच. काही व्यक्तीमध्ये हा न्यूनगंड इतका जबरदस्त असतो की रांजचं जगणंसुध्दा अशा व्यक्तींना कठीण वाटतं. कठोर निर्णय घेणे, तत्वांचा काटेकोर अवलंब करणे अशा व्यक्तींना शक्यच नसते. या व्यक्ती अतिशय हळव्या अति संवेदनशील असतात या व्यक्तींना आपण जगण्याला नालायक आहोत, भुईला भार आहोत असे वाटत असते. ज्यांचे बालपण अतिशय कठोर शिस्तीत गेलेलं असतं किंवा कौटुंबिक हिंसाचार व मानसिक दडपणाखाली गेलेलं असतं. त्यांच्या मनात अशा भावना जास्त तयार होतात. लहानपणी, तरूणपणी सतत मानसिक खच्चीकरण झाले असल्यास असा अपराधीपणा मनाला सतत डाचत राहतो. अशा व्यक्ती लवकर व्यसनाधीन होतात.

मानसशास्त्रामध्ये याला गील्ट कॉम्प्लेक्स म्हणतात. अनेकांना पदोपदी आपण चुकलो तर नाही ना? पैसे पाकिटात व्यवस्थित ठेवलेत की नाही, वस्तू जागच्या जागी आहेत की नाही अशी वारंवार चाचपणी करावी लागते. ही मंडळी स्वयंनिर्मित दडपणाखालीच असतात. हे लोक इतरांच्या मताला अवाजवी महत्व देतात. त्यामुळे यांचे स्वतःचे जीवनच यांना उरत नाही. लोक काय म्हणतील या एकाच तत्वावर यांचे आयुष्य चालते. स्वतःला काय वाटतं, काय आवडतं याचा विचार करायलाही हे लोक घाबरतात. स्वतःची भावना नाकारत, अपराधीपणाच्या जोखडाखाली आयुष्य रेटत राहतात.

सारखं येता जाता सॉरी म्हणणं, अजीजी करणं, माफी मागणं, आपल्यातच काहीतरी कमी आहे असं मानणं ही अपराधी न्यूनगंडाची प्रमुख लक्षणं आहेत. स्वतःच्या विचारांचीच कैद यांना उमलू देत नाही. यांच्या आयुष्यात वसंत कधी फुलतच नाही. सगळ्यात वाईट गोष्ट अशी की अशा व्यक्ती आपल्या कुटूंबीयांच्या, जोडीदाराच्या
आयुष्यातही वसंत फुलू देत नाहीत. स्वतः सुखी व्हायचं नाही आणि दुसर्‍याला सुख लाभू द्यायचं नाही. यामुळे आपोआपच हे लोक आयुष्यात मागं पडत जातात. पैशाची नाही तर विचारांची श्रीमंती आपल्याला जास्त धनवान बनवते. आपला अ‍ॅप्रोच महत्वाचा असतो. आई वडिलांना आपल्या मुलांच्या पंखामध्ये जोर भरला पाहिजेब. तुलना करून, मारझोड करून, दूषणे देऊन पंख छाटू नयेत.Dr sarnobat

अशीच एक रूग्ण ट्रीटमेंटसाठी येत असे. तिचं तिच्या सासूशी लग्नापासून कधीच पटलं नाही. सासू उतारवयात आजारी पडली व अंथरूणाला खिळली. या सुनेनं तिची सुशुषा केली पण तोंड वाकडं करून, आदळआपट करून सासू शेवटी जर्जर होऊन वारली. पण सुनेया मनात अपराधीपणाची भावना राहिली की आपण तिची मनोभावे सेवा केली नाही. यातून आपली कधी सुटका होणार याचाच विचार करत राहिली. चांगली सेवा केली असती तर सासूचे आशीर्वाद तरी मिळाले असते, या विचारांनी सुनेचा पुरता ताबा धेतला. तिला घरात भास होऊ लागले झोप उडाली. कोणीतरी बोलत आहे, हसत आहे, असे आभास होऊ लागले. घरातले वातावरण बिघडले.
या रूग्ण स्त्रीला समुपदेशन, पुष्पौषधी व होमिओपॅथीचाच फायदा झाला. म्हणून हक्क मागण्याआधी कर्तव्यपूर्ती केली तरच सुख लाभते. हा एक सुखाचा कानमंत्र आहे. नेमके कारण व नेमकी लक्षणं लक्षात येणे हे तज्ज्ञांच्या व रूग्णांच्यादृष्टीने खूप महत्वाचे असते.

शारीरिक स्तरावर या अपराधी कॉन्शस व्यक्तींना बरेच आजार होतात. जगण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसल्याने या व्यक्ती कायम थकलेल्या असतात. हे लोक कुबउ काढून चालतात. सतत थकवा येणे, अल्सरी, कोलायटीस, आयबीएस असे आजार होतात. झोपेत किंवा जागेपणीसुध्दा दात खाण्याची सवय असते. एखादी विशिष्ट शारीरिक लकब म्हणजे सारखी मान मोडणे, बोटाचे चाळे करणे, हाताने सारखी पँट वर करणे, भुवया उडवणे, आपल्याच डोक्यावर टपली मारणे, नाक उडवणे इ. सवयी असतात. अशा व्यक्तींना होमिओपॅथी व पुष्पौषधी यांचा फायदा होतो.
DrSonali Sarnobat
9916106896
9964946918
www.thebachflower.com

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.