Tuesday, April 30, 2024

/

दुचाकी चोरट्याला मार्केट पोलिसांनी केली अटक

 belgaum

बेळगाव शहर आणि परिसरात सराईत दुचाकी चोरट्याला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख 95 हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे अनेकात खळबळ माजली असून शहर आणि उपनगरातून चार दुचाकी त्यांनी चोरल्या होत्या. चंद्रु हरिजन वय 25 राहणार रुकमिनी नगर पहिला क्रॉस, दुसरी गल्ली असे त्याचे नाव आहे. या कारवाईमुळे चोरट्यामध्ये भीती निर्माण झाली असून या चोरी मागील अनेक वर्षापासून केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी पोलीस उपनिरीक्षक एम एस वटारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता त्याच्या जवळून होंडा एक्टिवा रॉयल इन्फिल्ड बुलेट हिरो एचएफ डीलक्स व बजाज डिस्कवर अशा दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.

 belgaum

त्याने आणखी कुठं चोरी केली आहे की काय याचा शोधही सुरू करण्यात आला आहे. चोरलेल्या दुचाकी बेळगाव व उपनगरांतून चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. दोन दिवसांपूर्वी जुन्या पी रोड वरील भाजी मार्केट नजीक पोलिसांनी त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात अनेक चोरट्यांचा सुगाव लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या कारवाईमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.