बेळगाव शहर आणि परिसरात दुचाकी वाहने चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश मार्केट पोलिसांनी केला आहे. त्यांच्या कडून 3 लाख किंमतीची 8 वाहने जप्त केली आहेत.
पोलिसांनी अक्षय अशोक तांदळे रा. येळ्ळूर रोड बेळगाव,प्रसाद अशोक पाटील रा.उद्यमबाग,ओमकार श्रीकांत इंगळे रा. चव्हाट गल्ली बेळगाव व शंभू राजू वाडकर रा. कोळी गल्ली बेळगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मार्केट ए सी पी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.