अतिवाड येथे आत्महत्या केल्याच्या घटनेच्या निदर्शनात ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेचे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अतिवाड, बेकीनकेरे आणि उचगाव ग्रामस्थांनी पोलीस आयुक्त के त्यागराजन यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
रिया दीपक बेळगावकर वय अकरा असे त्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. दरम्यान या मुलीचा आत्महत्येने मृत्यू झाला नसून तिचा घातपात झाला आहे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत निवेदनात असे म्हटले आहे की संबंधित तरुणी अल्पवयीन असून तिचा खून झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या परिसरातील नागरिकांनी याविरोधात जोरदार निदर्शने केली आणि मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. संबंधित तरुणी दिनांक सहा सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. मात्र या तरुणीने आत्महत्या केली नसून त्या मुलीचा खून करण्यात आला आहे, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिस आयुक्त त्यागराजन यांनी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या मृत्यूप्रकरणी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून आता त्या मुलीचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान काही नराधमांनी संबंधित मुलीचे अपहरण करून तिचा खून करण्यात आला आहे असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे काकती पोलिसांनी आणि पोलिस आयुक्तांना निवेदन पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान संबंधित तरुणी अकरा वर्षांची होती. मात्र ती आत्महत्या केल्याचे भासवून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशीची गरज आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तीन गावच्या नागरिकांनी या निवेदनासाठी प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागाच्या आमदारानीही या प्रकरणात पुढाकार घेतला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित निवेदनात राष्ट्रपतींचे नावे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशीच मागणी होत आहे.