Monday, December 23, 2024

/

“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा

 belgaum

कोरोनाच्या काळात आर्थिकरित्या अनेकजण हतबल झाले असतानाच आपल्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम शहानिशा करून प्रामाणिकपणे बेळगाव अतवाड येथील बालाजी चिकले या कलाकाराने परत केली आहे.

कोरोना परिस्थितीमुळे लहान-मोठ्या कलाकारांची अवस्था आता बिकट झाली आहे. यात्रा-जत्रा, सण-उत्सवांमध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करून उदरनिर्वाह चालवायचे. परंतु गेल्या सहा महिनांपासून उपजीविकेचे साधनच उपलब्ध नसल्याने या कलाकारांनी जगायचे कसे? असा प्रश्न कलाकारांसमोर आहे. अशा कठीण प्रसंगातही आपल्या बँक खात्यात आलेली ७१,९०६ रुपयांची अनावधानाने आलेली रक्कम संबंधित ठिकाणी परत करून अतवाड गावातील कलाकार बालाजी चिकले यांनी प्रामाणिकपणा दाखविला आहे.

बालाजी हे लावणी नृत्य कलाकार आहेत ते मुंबईत अभियंता म्हणून काम करतात ते मूळचे बेळगाव तालुक्यातील अतवाड गावचे रहिवाशी आहेत

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी असलेला हा निधी कार्डियल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या खात्यातून अनावधानाने चिकले यांच्या खात्यात ११ सप्टेंबर रोजी जमा झाला. अचानकपणे इतकी मोठी रक्कम आपल्या खात्यात कुणी जमा केली? याची शहानिशा करण्यात आली असता हा निधी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी असल्याची माहिती चिकले यांना मिळाली. तात्काळ त्यांनी याची माहिती काढून संबंधित हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. आणि पुन्हा ही रक्कम हॉस्पिटलच्या देऊ केली.

यासंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन नंतर आमच्या कलापथकाची खूप परवड झाली आहे. सण, समारंभ, उत्सवांना आम्हाला परवानगी नसल्यामुळे उपजीविकेचे साधन पूर्णपणे बंद आहे. बेळगावमधील अनेक मान्यवरांनी आम्हाला मदत देऊ केली. परंतु कला सादर करून उदरनिर्वाह करण्याची सवय असल्यामुळे अशाप्रकारची मदत घेणे आमच्या मनाला पसंत नाही. अशावेळी सरकारने आपल्या खात्यात रक्कम जमा केली असावी, आणि या रक्कमेतून ६ महिने आपला उदरनिर्वाह होऊ शकेल, या आनंदात होतो. परंतु शहानिशा केल्यानंतर ही रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी असल्याचे समजले. आणि तात्काळ ही रक्कम संबंधित हॉस्पिटलला परत करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.tamasha balaji

बालाजी चिकले यांच्या कलापथकात २०० हून अधिक कलाकार आहेत. १७ वर्षांहून अधिक काळ कलेची सेवा केली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले. मुंबई येथे कार्यक्रम सुरु होते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वच कार्यक्रम रद्द झाले. मुंबईच्या कार्यक्रमानंतर परदेशी आपली कला सादर करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे ही संधीदेखील हिरावली, आणि पुन्हा आम्ही अडचणीत सापडलो, चार महिन्यांपूर्वी गावी परतलो.

बेळगावमधील अनेकानी मदतीचा हात पुढे केला. कलेची आणि कलाकारांची जाण ठेऊन मदत केलेल्या अनेकांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले. परंतु प्रत्येक वेळी मदत घेणे हे योग्य वाटत नाही. फेब्रुवारीपासून आजपर्यंत एकही कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे आता सर्वत्र अंधारमय परिस्थिती जाणवते आहे. आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न अनेक लहान-मोठ्या कलाकारांसमोर उभा आहे. लहान-मोठ्या कलाकारांच्या अशा अनेक व्यथा आहेत, या व्यथा घेऊनच आम्ही जगण्यासाठी धडपड करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बिनबाईचा तमाशाकार ‘बेळगावचा बालाजी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.