Sunday, April 28, 2024

/

बेळगावचा रेल्वे विकास खुंटला : सतीश तेंडुलकर

 belgaum

सुरेश अंगडी यांच्या निधनाने बेळगाववर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बेळगावमधील एक तळागाळातील कार्यकर्त्यांचा नेता हरपला असून बेळगावसाठी ही दुःखद घटना आहे, अशा शब्दात सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सचिन तेंडुलकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सिटीझन कौन्सिल आणि खासदार सुरेश अंगडी यांचे नाते एक वेगळ्याच पद्धतीचे होते. प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे किंवा व्हॅट्सऍपद्वारे सतत संपर्कात असणाऱ्या सुरेश अंगडी यांनी सातत्याने रेल्वे संदर्भात जनतेची काय मागणी आहे? यासाठी विचारणा केली होती.

त्यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा मंदिर येथील रेल्वे ओव्हर ब्रिजची दुर्दशा झाली होती. यासंदर्भात सिटीझन कौन्सिलने आवाज उठविला होता. ही बाब खासदारपदी असलेल्या सुरेश अंगडी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या गोष्टीचा पाठपुरावा त्यांनी वरिष्ठ पातळीवर करून संबंधित रेल्वे विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.File pic... mos railway and citizen council

 belgaum

बेळगावच्या रेल्वे ओव्हर ब्रिज पुन्हा नव्याने उभारण्यात त्यांचा मोलाचा वाट होता. सुरेश अंगडी यांची रेल्वे राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर जनतेच्या मागण्यांचा त्यांनी पाठपुरावा सातत्याने केला.

बेळगावमधून अधिकाधिक ठिकाणी रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. शिवाय बेळगावच्या रेल्वेस्थानकाचाही कायापालट करून रेल्वे विभागाच्या वतीने विविध रेल्वे सेवा सुरु करण्याचाही त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. बेळगाववर नितांत प्रेम असणाऱ्या खासदारांचे निधन ही बेळगावसाठी दुःखद घटना असून, बेळगावमध्ये रेल्वे विभागाचा विकास सुरेश अंगडी यांच्या जाण्याने खुंटला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सुनील आपटेकर यांनी वाहिली श्रध्दांजली

सुरेश अंगडी यांनी मंत्री झाल्यापासून बेळगावच्या रेल्वे खात्याला न विसरणार योगदान दिले आहे.रेल्वे विकास कामाचा सपाटा लावला होता नवनवीन रेल्वेना चालना दिली होती.अंगडी राजकारणी असे आम्हाला कधीही वाटलं नाही.भावनांची कदर करणारा माणूस होता. बेळगावला रेल्वेचा अजून विकास होईल हा आधार होता नष्ट झाला आहे अशी श्रद्धांजली इंडियन रेल्वे बॉडी बिल्डिंग कोच मुख्य तिकीट निरीक्षक सुनील आपटेकर यांनी वाहिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.