आचार्य गल्ली शहापूर येथे वृद्ध बहीण भावाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.यदुकुलेश रामचंद्र नाईक वय 61, पंकजा रामचंद्र नाईक वय 70 अशी या वृद्ध भावंडांची नाव आहेत.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार नाईक कुटुंबातील दोघेचं वृद्ध भावंड आचार्य गल्लीत रहातात सोमवारी आतून बंद केलेला दरवाजा गुरुवारी पर्यंत उघडला त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाई याची कल्पना दिली असता दरवाजा उघडताच दोन्ही भावंडांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची उघडकीस आले आहे.
आतून घरचा दरवाजा बंद होता पोलिसांनी दरवाजा खोलून मृतदेह शल्यचिकित्सेसाठी पाठवले.दोन्ही वृद्धांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते.या भावंडांनी नेहमी आत्महत्या का केली याचा तपशील अद्याप मिळाला नसून शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.