घरफोड्याला काकती पोलिसांनी केली अटक

0
3
Kakati police station
Kakati police station
 belgaum

बंद घरातून २,७१,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करणारा घरफोड्या काकती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
या घरफोड्याकडून काकती पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड जप्त केली आहे.

२७ जून रोजी बेळगाव तालुक्यातील मणगुत्ती या गावात यल्लाप्पा गंगाप्पा गौडन्नावर यांच्या घरातून सुमारे २,३९,००० रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १,३५,००० रोख रक्कम चोरी झाली होती. यासंदर्भात काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर काकती पोलिसांनी याचा तपास घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी सापळा रचला होता. यात काकती पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. हा आरोपी हगेदाळ या गावचा असून यल्लाप्पा भीमाप्पा नाईक (वय २७) असे त्याचे नाव आहे.

 belgaum

या आरोपीकडून १४.५६० ग्रॅम वजनाची सोनसाखळी, १७.५०० ग्रॅम वजनाचा हार, ५ ग्रॅम वजनाची बोरमाळ, तसेच १,३५,००० रुपयांची रक्कम असा एकूण २,७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काकती पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.