Tuesday, December 24, 2024

/

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

 belgaum

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ लागले. दंगेखोर आणि चंचल असला तरी तो आपला अभ्यास, काही ठराविक कामं व्यवस्थित करत असे. पण आजकाल त्याला होमवर्क करणेसुध्दा जड जाऊ लागले.

ब्लॅकबोर्डवर लिहिलेले व्यवस्थित उतरवून घ्यायचे नाही. रोज काहीतरी शाळेत विसरायचं, मध्येच शुन्यात नजर लावून बसायचं. गणितात, स्पेलींगमध्ये उगाचच काहीतरी चुका करायच्या असं रोज काहीबाही होऊ लागलं. आईवडील, शिक्षक काही सांगत असताना तोंडावर मख्ख भाव असायचे. शाळेत आपसूकच ग्रेडस अ+ चे उवर आले.

अमिरखानने एक गोष्ट फार चांगली केलेय ती म्हणजे तारे जमीन पर सारखा चित्रपट काढून पालकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलंय. त्यामुळे पालकवर्ग जरा सुजाण बनला आहे. तर रोाहितचे आईवडील रोहितला होमिओपॅथिक औषधासाठी घेऊन आले आणि नंतर समूपदेशन व उपचार यांनी तो सात- आठ महिन्यात सुधारलादेखील!

Health tips
तर सामान्य हायपरकायनेसिया (चंचलता) व अऊकऊ यात बराच फरक आहे. 3 ते 5 टक्के शाळेत जाणार्‍या मुलांना याचा त्रास होऊ शकतो. अशा मुलांना वेळीच योग्य दिशा व उपचार न दिल्यास मूर्ख, ’ढ’, वेंधळा अशी विशेषण कायमची चिकटतात व मूळ प्रवाहातून बाजूला फेकली जातात. ही एक न्यूरॉलॉजीकल (चेतनसंस्थेमुळे होणारी) वर्तनविकृती असून आठव्या वर्षापासून पुढे दृष्टीपथात येते. अटेंशन डेफीसीट म्हणजे एकाग्रता न होणे, चंचलता आणि इंपलसीव्हीटी अर्थात कधी काय करावं याचा नेम नसणे असा हा तिहेरी आजार आहे.

3 ते 5 वयोवर्षाच्या कालावधीत मुलं मन लावून एकाग्रतेने काम करायला शिकतात. पण काही मुलांना आधी हे जमत असलं तरी नंतर हळुहळू सगळंच बिघडायला लागतं. ही मुलं अतिशय वेंधळी असतात. सारखं सांगूनही समजत नाही, आपल्या वस्तू कुठेही ठेवतात. हरवतात. सारखे हातपाय हलवणे, खांदे उडवणे, एका जागेवरून दुसरीकडे असे फिरत राहणे, वर्गात फिरत राहणे, असे प्रकार होतात. या मुलांना सगळ्यागोष्टी एकदमच घडत आहेत असे वाटते आणि आपण काय करावं याचाच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे त्याच्या गोंधळ उडतो व ती घाबरून जातात. समोरचा माणूस काय विचार करीत आहे किंवा दुसरे लोक कसा विचार करतात याबद्दल अशा मुलांना अंदाजच बांधता येत नाही. त्यामुळे ती सारखच चुकत राहतात. किंबहुना मारही खातात. सारखं ओरडून घेतात.

कारणे- चेतनसंस्थेतील व मेंदूमधील दोन चेतावाहिन्यातील संदेशवाहक द्रव्यामधील बिघाडामुळे हा आजार होतो. क्वचित फीट्स येणाया मुलांमध्ये हा विकार जास्त आढळतो. हा आजार अनुवंशिकसुध्दा आहे. कौटुंबिक संघर्षामुळे, सततच्या मानसिक तणामुळेसुध्दा हा विकार होऊ शकतो. अर्थात पालकांमधील बेबनाव, सततची भांडण, कौटुंबिक मतभेद यामुळे चिमुकल्यांच्या विश्‍वात खूपच उलथापालथ झालेली असते. काही हुषार मुलं पालकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम अशा काही चुका करत असल्याचा आव आणतात. ’तारे जमीन पर’ पाहून आईवडील सजग झालो तशी आपली मुलं पण हुषार झाली बरं का!

उपचार- या मुलांना जर योग्य वेळी उपचार समुपदेशन (काऊन्सेलिंग) मिळालं तर अक्षरशः नेत्रदीपक कामगिरी करू शकतात. सध्याच्या ऑलिम्पिकमध्ये पोाहण्याच्या स्पर्धेत 8 सुवर्णपदके मिळवणारा ’मायकेल फेल्फ’ हा सुध्दा अऊकऊ या विकाराने त्रस्त होता. शाळेने कधीच त्याच्यासमोर हात टेकले होते. परंतु त्याच्या आईच्या अथक परिश्रमामुळे आज तो इतके यश मिळवू शकला. होमिओपॅथीमध्ये अशा मुलांसाठी अक्षरशः अगणित औषधं आहेत. तर सजग पालक व होमिओपॅथिक तज्ज्ञ अशा मुलांना योग्य दिशा देऊ शकतात. पुष्पौषधीमुळे भावनिक लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. अऊकऊ ने त्रस्त मुलं चांगली संगीततज्ज्ञ, पत्रकार, खेळाडू व कलाकार होऊ शकतात. त्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन यांची जोड मिळावी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.