Monday, May 13, 2024

/

ओझिना -वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobatसंयोगिता तीस वर्षाची तरूणी! तिला क्रॉनिक सायनोसाटीसचा त्रास होता. सारखी सर्दी सारखं नाक चोंदणं, नाकातून सारखेच हिरवट पिवळे शेम यायचे. नंतर तर या कफासारख्या द्रवाला वासही यायला लागला. संयोगितालाच काय तिच्याजवळ असणार्‍या सर्वांनाच तो वास जाणवायला लागला. या क्रॉनिक सायानोसायटीसमध्ये होणार्‍या, पिकलेल्या सर्दीला ओझिना म्हणतात. सायनसीस म्हणजे मानवी कवटीत असणार्‍या हवेच्या पोकळ्या, हाडाच्या पोकळीमध्ये नाकातूनच या सायनसीस खोललेल्या असतात. हवेचा दाब व झोतावर नियंत्रण ठेवण्याचे काम या सायनसचे असते. नाकाच्या बाजूला मॅक्झीलरी, नाकाच्या तळाला, भुवईच्या माग स्फिनॉईड, टाळ्यावर इथमॉयडल, भुवईवर अँट्रलव भुवयांमध्ये फ्राँटल असे सायनसीस असतात. सारखी सर्दी होता होता ते इन्फेक्शन या सायनसीसमध्ये शिरते.

कारणे व लक्षणे- व्हिटॅमिन ए ची कमतरता, कुपोषण, सतत दुःखात व टेन्शनमध्ये असणे, असमाधानी राहणे, प्रतिकारशक्ती कमी असणे, प्रदूषण, हवामानातील चढउतार यामुळे सर्दीचा प्रादुर्भाव होतो. सारखी सर्दी राहिल्याने सायनोसायटीस होऊ लागतो. अनेक विषाणू जीवाणू व विशिष्ट प्रकारची बुरशी यामुळे ही सर्दी पिकते व क्रॉनिक सायनोसायटीस होतो.

एक नाक चोंदते व दुसरे वाहते. नाकाच्या बाजूला, कपाळावर, घशात काहीवेळा हिरड्यांवर दुखते सायनसीस मधला द्राव ऑस्टीयममधून नाकात आला नाही तर सायनस ब्लॉक होतात. कफ घट्ट होतो. सर्दी अजिबात बाहेर पडत नाही. त्यामुळे व्हॅक्युम हेडेक हणजे सायनसची डोकेदुखी सुरू होते. डोके गच्च होतं. जरा मान हलवली की चक्कर येते. मळमळल्यासारखं होतं. सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखायला सुरूवात होते. कुठंतरी दुपारनंतर दुखणं कमी होतं. डोक्यात घण घातल्यासारखे होतात. चिडचीड होते. डिप्रशन येते. एका यासनोसायटीसमुळे हर तर्‍हेचे त्रास होतात. ताप येतो. घसा बसतो. हे एक दुष्टचक्रच होते. खूप दिवस त्रास तसाच राहिल्याने मग ओझिनाचा त्रास होऊ लागतो. हिरड्यांमध्ये इन्फेक्शन उतरल्याने हिरड्यामध्ये पू होणे, दात विसविशीत होणे, तोंडाला वास येणे, तोंड कडू होणे, चव न लागणे अशी लक्षणं अनुभवायास येतात.

 belgaum

उपचार- ’अ’ आणि ’क’ जीवनसत्व- सर्दी व सायनसचा त्रास कमी होण्यासाठी साईसकट दूध, दही, अंड्याचा पिवळा बलक, भोपळा, गाजर, पालेभाज्या, टोमॅटो, आंबे, पपई हे पदार्थ खावेत. लिंबू, मोसंबी, पालक, मेथी, संत्र इत्यादीचाही आहारात समावेश असावा. आनंदात राहण्याची सवय लावून घ्यावी. चिंता काळज्या दुःख सगळ्यांना असतातच. पण त्यांना विशिष्ट प्रमाणात काबूमध्ये ठेवावे मन आनंदी, प्रफुल्लित ठेवल्याने आजारही लांब राहतात.

पातळ सुती फडक्यात थोडे काळे जिरे बांधून पुरचुउी करावी. मधून मधून त्याचा वास घ्यावा. चोंदलेले नाक मोकळे होते. 100 ग्रॅम जिरे भाजावे. बारीक कुटावे. त्यात 200 ग्रॅम मध घालून हे चाटण अधूनमधून खावे. सुवासिक तेल व अत्तर वापरू नये. व्यवस्थित विश्रांती, मोकळ्या ताज्या हवेत फिरणं, ग्रीनटी (तुळस, ज्येष्ठमध, मिरी, लवंग, गवती चहा यांचा काढा) सकाळी घेतल्याने सर्दी होत नाही. होमिओपॅथिने कोणत्याही स्टेजमधला सायनोसायटीस बरा होतो. डोकेदुखी, ओझिना, यासनस मधली कोरडी सर्दी, सर्दी पिकणे यावर अनेक होमिओपॅथिक औषधे आहेत. लक्षणे व्यवस्थित सांगून इमानेइतबारे उपचार घेतल्यास खचितच गुण येतो. काही रूग्णांना सात आठ वर्षाची सर्दी एका आठवड्यात कमी व्हावी अशी अपेक्षा असते. पण त्याकरता औषधं वेळेवर घेणे, व्यवस्थित फॉलोअप ठेवणे, पथ्य पाळणे, दैनंदिन जीवनात आवश्यक फेरफार करणे मात्र अजिबात नको असते.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.