बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम पुरस्कार जाहीर करन्यात येतो. हा पुरस्कार 2 ऑक्टोंबर रोजी देण्यात येतो.
त्यासाठीचे प्रस्ताव राज्य सरकारने मागविले आहेत. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील पाच गावे गांधीग्राम पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहेत. हा प्रस्ताव राज्य सरकारने मागविला आहे तर बेळगाव जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमधील 70 गावांची नावे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील एक गावाची निवड करून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्यातील पाच गावांची निवड प्रक्रिया झाली असली तरी आता त्या गावांचा सर्वे करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये विकास झाला आहे त्याचे नाव जाहीर करून त्यांना हा गांधी पुरस्कार देण्यात येणार आहे. सध्या बेळगाव तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे तर काही ग्रामीण भागात अजूनही बरीच कामे प्रलंबित आहेत.
दरम्यान उद्योग खात्री, ज्या गावात रस्ते गटारी पाणी व्यवस्था आणि सोयी सुविधा आहेत त्या गावांची गांधीग्राम पुरस्कारासाठी निवड केली जाते. बेळगाव तालुक्यातील पाच गावांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्यामधील गावांचा सर्वे करूनच ही निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना गांधी ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मात्र सध्या कोरोना काळात हा पुरस्कार देण्यात येणार की नाही अशी साशंकता होती. मात्र सध्या राज्य सरकारने यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील कोणत्या गावाला गांधीग्राम पुरस्कार मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.