Friday, April 26, 2024

/

मोदींच्या नावावर निवडून आलेले नेते “फेसलेस”

 belgaum

भाजप हा एक धर्मापुरता मर्यादित पक्ष आहे. धर्माच्या नावावर राजकारण करून मोदींच्या नावावर निवडून आलेले नेते काहीच कामाचे नसून ते “फेसलेस” आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार ध्रुवनारायण यांनी केला आहे. बेळगावमध्ये काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला, परंतु काँग्रेसच्यावतीने आखण्यात आलेले कार्यक्रम आजपर्यंत फसले गेले नाहीत. असे ठाम मत ध्रुवनारायण यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोविडमुळे उद्भवलेली समस्या हाताळण्यात राज्यसरकार अपयशी ठरले असून नुकत्याच अमलीपदार्थाच्या प्रकरणात भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजना आणि रागिणी या सॅण्डलवूड सिनेस्टार आहेत. याची लाज भाजपाला वाटली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले कि, जीएसटीच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून राज्यासाठी कोणत्याही खासदाराला अनुदान मागायची हिम्मत झाली नाही, राज्याचे मुख्यमंत्री स्वतःला वाघाची उपमा देतात. परंतु वाघाप्रमाणे ते केंद्रासमोर कधीही का वागले नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 belgaum

केपीसीसीच्या वतीने आरोग्यसंबंधी उपक्रम हाती घेण्यात आला. या माध्यमातून २२४ विभागातील प्रत्येक वॉर्डमध्ये २ कोरोना वॉरियर्स नेमण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी ३२० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. त्यांनीही सहकार्याची भावना दाखविली. राज्यात एकाच दिवसात ९ हजार पॉझिटिव्ह केसीस पुढे आल्या आहेत. समूह संसर्ग रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. परंतु हि जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे कोरोना काळात सरकारला नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे.

राज्यसरकारसह केंद्रसरकारही ही परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप ध्रुवनारायण यांनी केला आहे. यादरम्यान जीएसटी, कर्जवितरण आणि अनेक गोष्टींवर सरकार अपयशी ठरल्याबद्दल तसेच सद्यस्थितीत सरकार कोविडसह समाजव्यवस्था संभाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.

या बैठकीला सदानंद डंगनावर, राजू सेठ, विनय नावलगट्टी यांसह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.