Friday, May 3, 2024

/

बेळगावची कोविड परिस्थिती “रामभरोसे”

 belgaum

कोरोनाने अत्यंत झपाट्याने आपले हातपाय पसरले असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची कमतरता भासू लागली आहे. कोणत्याही रुग्णालयात बेड मिळणे आता दुरापास्त झाले आहे. अनेक शहरांमधून बेडच्या उपलब्धतेबाबत डॅशबोर्ड तयार केले आहेत परंतु बेळगावमध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत हे कळणे मात्र अवघड झाले आहे. यामुळे कोविड रुग्णांची ससेहोलपट होत आहे.

जिल्हा रुग्णालयात बेड्स हे काही दिवसांपासूनच उपलब्ध नाहीत याची माहिती समोर येत होती. परंतु आता मात्र जिल्हा रुग्णालयाच्यावतीनेच याचा दुजोरा मिळत आहे. परंतु तरीही जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने वेळीच सजगता दाखवून कोविडवर उपचार घेणाऱ्यांची संख्या तसेच उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या याचा तपशील एकत्रित करून तो सार्वजनिकरित्या जाहीर करणे आवश्यक आहे. यामुळे या रुग्णालयातून त्या रुग्णालयात बेडसाठी होणारी धावपळ थांबून रुग्णांना योग्यवेळी योग्य उपचार मिळतील.

कोविड ची परिस्थिती सामोरी आल्यापासून बेळगावच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर टीकाही करण्यात येत आहेत. सातत्याने तेथील अव्यवस्था आणि असुविधेच्याबाबतीत अनेक प्रसारमाध्यमांवर बातम्या प्रसारित होत आहेत. यामुळे आता बेळगावच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणाऱ्याची नितांत गरज आहे.Corona

 belgaum

बेळगावमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता येथे अनेक अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. कोविड केअर साठी कोट्यवधी रुपयांचा निधी घोषित केला गेला. आणि कोविड साठी या निधीतून खर्च करण्यात आल्याचेही जाहीर केले गेले. मात्र इतका खर्च करूनही अजूनही रुग्ण सुविधांपासून वंचित का आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हि परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आहे. सोमवारी मुख्यमंत्री पूरग्रस्त भागात हवाई सर्वेक्षण करणार आहेत. त्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांच्यावतीने मागणी करण्यात येत आहे.

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी असल्यामुळे अनेक रुग्णांना याचा फटका बसत आहे. अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरितीने होण्यासाठी एमपीएलएडी फंडाचा वापर करून हि यंत्रणा का खरेदी केली जात नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.