15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील “हेल्प फाॅर नीड” या संघटनेतर्फे सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये आज शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
गेल्या कांही दिवसांपासून कोरोनामुळे तसेच अन्य नैसर्गिक कारणांमुळे शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शहरातील प्रमुख स्मशानभूमी असणाऱ्या सदाशिवनगर स्मशानभूमीमधील अंत्यसंस्कारांची संख्यादेखील वाढली आहे. परिणामी स्मशानामध्ये अंत्यसंस्कारासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे नाईलाजाने स्वच्छतेकडे थोडे-फार दुर्लक्ष होत आहे.
हि बाब लक्षात घेऊन तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी हेल्प फाॅर नीडी या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आज शनिवारी सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली.
कोरोनामुळे तसेच अन्य नैसर्गिक कारणांमुळे शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शहरातील ठीकठिकाणच्या स्मशानभूमींमधील अंत्यसंस्कारांचे प्रमाण वाढले आहे. अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढल्यामुळे स्मशानभुमीमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी स्मशानभूमीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे ही बाब ध्यानात घेऊन आम्ही ही स्वच्छतामोहीम राबविली असल्याचे सुरेंद्र अनगोळकर यांनी सांगितले.
तसेच शहरातील युवक मंडळी आणि सामाजिक संस्थांनी आपापल्या भागातील स्मशानभुमीची स्वच्छता करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.