Sunday, April 28, 2024

/

कोरोना वाढला 1700 ऍक्टिव्ह केसेस

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाचा झंझावात इतका वाढला आहे की काल शुक्रवारी एका दिवसात राज्यात एकूण 7,908 आणि बेळगाव जिल्ह्यात 334 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांपैकी 80 रुग्ण बेळगाव तालुक्यातील असून सुमारे 120 बेळगाव शहर परिसरातील आहेत.

गेल्या जुलै महिन्यापासून बेळगाव शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहरात दररोज आढळून येणाऱ्या 20 ते 30 रुग्णांचे प्रमाण आता रोज 100 हून अधिक झाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या शहरात 1,700 ऍक्टिव्ह केसेस आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन संकल्पना मागे पडली असून आता घरे, फ्लॅट किंवा अपार्टमेंट सील डाऊन केली जात आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य खात्याने सरकारी वैद्यकीय उपचार यंत्रणेवरील ताण हलका करण्यासाठी शक्य असेल त्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यास अनुमती दिली आहे. तसेच फक्त गंभीर अवस्थेतील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले जातील असे सांगण्यात आले आहे. तथापि एकंदर परिस्थिती पाहता सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे म्हणजे एक भयानक अनुभव ठरणार आहे.

 belgaum

शहरातील हॉस्पिटल्समध्ये किती कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि किती बेड्स उपलब्ध आहेत, याची अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. केएलई रुग्णालय 200 बेड्स क्षमतेचे आहे. हे रुग्णालय वगळता शहरातील अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये 10 ते 40 पेक्षा कमी बेड्स आहेत.

बेळगांव शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गेल्या 3 एप्रिल रोजी कॅम्प येथे आढळून आला होता. कॅम्प मागोमाग अमननगर आझाद गल्ली, आस्मा कॉलनी, सदाशिनगर येथे आणि त्यानंतर संपूर्ण शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येऊ लागले. कोरोना संसर्गाच्या बाबतीत वडगांव हा भाग सध्या शहरातील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. त्याखालोखाल सुभाषनगर, शहापूर, अंजनेयनगर, रामतीर्थनगर, उज्वलनगर, हिंडलगा, खासबाग, आयटीबीपी सेंटर आणि एटीएस सांबरा येथे मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कम्युनिटी ट्रान्सलेशनला अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्यामुळे जुलै महिन्यापासून रोगाचा संसर्ग कोणापासून झाला याचा शोध घेणे थांबविण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थांबून आता कोरोनाग्रस्तांच्या प्रायमरी कॉन्टॅक्टसची त्यांच्यात रोगाची लक्षणे आहेत का याची तपासणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.