belgaum

येत्या  गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडप अर्थात पेंडॉल उभारणीवर बंदी घालू नये तसेच इलेक्ट्रिकल आणि पेंडॉल डेकोरेशनचे कंत्राट स्थानिक लोकांना द्यावे, अशी मागणी बेळगांव इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्स असोसिएशन बेळगांव तालुका या संघटनेतर्फे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.

bg

बेळगांव इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्स असोसिएशन बेळगांव तालुका या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव सर्किट हाऊस येथे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेतप्रसंगी इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्स त्यांच्या दृष्टीने वर्षाची बेजमी करून देणारे हंगाम विशेष करून लग्नसराईचा हंगाम कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे वाया गेला आहे.

यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. आता गणेशोत्सवाच्या कालावधीत आपले झालेले नुकसान थोडेफार भरून काढण्यास मिळेल अशी आशा असताना कित्तूर येथील इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्सना बेळगाव शहर परिसरातील कामे देण्यात आली आहेत. हा अन्यायकारक प्रकार त्वरित थांबविण्यात यावा आणि स्थानिक इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्सना संबंधित कंत्राट दिली जावीत. वाटल्यास यासाठी कमी कोटेशनच्या निविदा मागविल्या जाव्यात.

Pendal association
Pendal association

त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीवर बंदी घातली जाऊ नये. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा खंडित केली जाऊ नये. कमी लांबी रुंदीची अट घालून सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारण्यास परवानगी दिली जावी, जेणेकरून श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्स मंडळींचे गेल्या सात-आठ महिन्यात झालेले नुकसान थोडे तरी भरून निघेल, असे पालकमंत्र्यांशी बोलताना स्पष्ट करण्यात आले.

निवेदन सादर करतेवेळी बेळगांव इलेक्ट्रिकल अँड पेंडॉल डेकोरेटर्स असोसिएशन बेळगांव तालुका या संघटनेचे अध्यक्ष नारायण चौगुले, सेक्रेटरी परशराम साळुंखे, आनंद चौगुले, भाऊ मन्नोळकर, भगवंत जोशी, बाळू जोशी, सुनिल रतन, दामोदर रतन आदींसह संघटनेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.