Sunday, April 28, 2024

/

पिरनवाडीच्या घरात घुसले पाणी

 belgaum

संततधार पावसामुळे पिरनवाडीच्या 60 हून अधिक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. रस्ते निर्माण करताना बेमको, ब्रम्हनगर आणि मजगाव येथील बुजवण्यात आलेल्या नाल्यामुळे पिरनवाडी नाल्याला आलेल्या फुगवटाने हा प्रकार घडला आहे. याचा त्रास मात्र पिरनवाडीतील गावकऱ्यांना सोसावा लागत आहे.

पिरनवाडी येथील नाला तुडुंब भरून वाहत आहे. या नाल्याच्या आकारही कमी झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी होत आहेत. त्यामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे इतकेेेच काय तर खानापुुर रोडवर पाणी आलं आहे.

पूर्वी या भागात अनेक नाले अस्तित्वात होते. मात्र रस्त्यांची निर्मिती करताना बेमको, ब्रम्हनगर आणि मजगाव येथील नाल्यांवर गंडांतर आले.

 belgaum

खादरवाडी धरणाच्या व्यतिरिक्त जैतून माळ सारख्या उंच भागातील पाणी पिरनवाडी नाल्यात मोठ्या प्रमाणात येत आहे गेल्या चार वर्षा पासून बेळगाव खानापूर रोड वर पाणी येत आहे यावर्षी देखील रविवारी या भागात पाणी शिरले होते.

पाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्यांचे अस्तित्व नाहीसे झाल्याने उतार असणाऱ्या पिरनवाडीच्या नाल्यात पाण्याचा ओघ वाढला आहे. याचा फटका मात्र नाल्यालगतच्या घरांना बसत असून घरामध्ये पाणी घुसण्याचा प्रकार वारंवार घडत आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.