राज्यात गेल्या 24 तासात नव्याने 6 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,03,200 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोना मुक्त झाल्यामुळे राज्यातील एकूण 1,21,242 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी राज्यात आणखी 6,706 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 03 हजार 200 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 78,337 असून यापैकी 727 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज गुरुवारी 8,609 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 1,21,242 इतकी झाली आहे. राज्यात कोरोनामुळे आणखी 103 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 3,613 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1893 रुग्ण – एकूण रुग्ण 81733), म्हैसूर (572-8989), बेळ्ळारी (445-12440), उडपी (402-7174), आणि दावणगिरी (328-4405).
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. बेंगलोर शहर 328 रुग्ण, हासन 49, धारवाड 34, बिदर 32, कलबुर्गी 31, मंगळूर 28, दावणगिरी 27, बेळ्ळारी 23, कोप्पळ 17, रायचूर 16, मंड्या 15, तुमकुर 15, कारवार 13, म्हैसूर 12, बेळगाव 9, चित्रदुर्ग 9, यादगिर 8, हावेरी 7, कोडगु 6, शिमोगा 6, चामराजनगर 5, चिकबळ्ळापूर 5, बागलकोट 4, चिकमंगळूर 2 आणि विजयपुरा 1 रुग्ण.