बेळगावच्या सोनार गल्ली वडगाव येथील ज्ञानदा प्ले ग्रुपच्या ज्ञानदा शक्ती या महिलांच्या समूहाने एक अनोख्या स्वातंत्र्यदिनाचे आयोजन केले होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने जमावबंदी केली आहे. संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. परिणामी अनेक सण-समारंभ आणि उत्सवावरही अनेक निर्बंध आले.
७४व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोविडच्या पार्श्वभूमीवर सोनार गल्ली, वडगाव येथील ज्ञानदा प्ले ग्रुपच्या महिला समूहाने घरी राहूनच स्वातंत्र्यदिन साजरा केला.
या अनोख्या उपक्रमात जवळपास १३० महिलांनी आपापल्या घरातूनच ऑनलाईन पद्धतीद्वारे राष्ट्रगीताचे गायन केले आहे. हि अनोखी संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका वरदा कुलकर्णी यांनी राबविली. तसेच या उपक्रमात मंथन ग्रुपच्या अध्यक्षा शोभा लोकूर, जय भवानी सहकारी संस्थेच्या संचालिका वर्षा जोशी, सामाजिक कार्यकर्त्या विजयालक्ष्मी कुलकर्णी यांच्यासह अनेक जणींनी आपला सहभाग दर्शविला.
तसेच परिणीता पाटील, लता हलगेकर, नम्रता धामणेकर, संगीता कडोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वातंत्र्यदिनी ज्ञानदा शाळेचा उपक्रम-130 जणी महिलांनी ऑनलाइन म्हटलं राष्ट्रगीत
#onlinenationalanthem
#gyanadaschoolvadgav
#livebelgaumfastnews
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1180139415676983&id=375504746140458