कोरोना महामारीच्या संकटामूळे चव्हाट गल्लीने देखील सार्वजनिक गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गल्लीतील मारुती मंदिरात श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करून आगमन किंवा विसर्जन कोणतीही मिरवणूक न काढता सोशल डिस्टन्सचे पालन करीत शासकीय नियमांचे अवलंब करत साध्या पद्धतीनं गणेश उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मागील वर्षीही चव्हाट गल्ली गणेश मंडळाने लवकर विसर्जन करणे आणि मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला होता या मंडळाने मूर्तीची उंची कमी केल्याने बेळगाव Live ने या मंडळाचा सत्कार देखील केला होता आता या वर्षी देखील सध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन या मंडळाने देखील सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
कोणतेही काम हे चव्हाट गल्लीत पेरलं जातंय ते शहरात उगवतं असे म्हणतात आता चव्हाट गल्लीने साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याच अनुकरण शहरात देखील नक्कीच होईल.
गणेश उस्तव वरील अटी ???
1) गणेश् मूर्ति मंदिरात् बसवा कारण लहान मडपात् बसवला तर कोरोना होईल
2) मंदिरात पुजेला काय गणेश भक्त येणार नाहित का ?गणेश मडपात् मोजकिच भक्त आले तर चालनार नाहि का?
3) मोठ्या गणेश मूर्तिमुले कोरोना होइल व लहान मूर्ति मुले होणार नाही का? ?
4) मंडप वरील ध्वनिषेप(सोउंड सिस्टिम्) मुले कोरोना होतो का व दुसर्या प्राथ्यना स्थलावरील भोग्या मुले का कोरोना नस्ट् होतो का? ?
???????????
सुरक्षित साठी योग्य अटी घाला त्या पेक्षा जास्त सुरशिता व कालजी घेउ आम्ही गणेश भक्त पन जर या मधे राजकारंन आनून गणेश उस्तव बंदी घालाल तर मग आम्ही सुधा सर्व बधने जुगाऋण उस्तव करू