दुचाकी धरणाच्या बांधावर पार्क करून येळ्ळूर येथील अरवळी धरणात उडी घेऊन आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह शोधून पाण्या बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोनाली संजय सुरेकर वय 18 भाग्यनगर 9 क्रॉस पारिजात कॉलनी बेळगाव असे आत्महत्त्या केलेल्या युवतीचे नाव आहे.ती महा विद्यालयीन विद्यार्थीनी होती
शनिवारी दुपारी या युवतीने धरणात उडी घेऊन आत्महत्त्या केली होती त्या नंतर घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी स्थानिक युवक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने मयत युवतीचा मृतदेह पाण्या बाहेर काढला आहे.
नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली आहे याबाबत पोलीस चौकशी करत असून अध्याप कारण अस्पष्ट आहे. मयत युवतीचे नातेवाईक घटनास्थळी दाखल दुपारीच दाखल झाले होते . यावर्षी पाऊस कमी झाल्याने अध्याप हे धरण तुडुंब भरलं नाही. ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
घरचे तिला सी ए कर म्हणत होते तिच्या मनात नव्हते म्हणून तिने टोकाचे पाऊल उचलले अन धरणात उडी टाकून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आहे.