दोन राज्यांच्या सीमेवर वाढला कम्युनिटी स्प्रेडचा धोका’-शिनोळी भागातून होणाऱ्या वाहतुकीने हा धोका वाढला आहे.कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शिनोळी गावात क्लिनिक चालवणाऱ्या एका 40 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याने सीमेवरील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील खेडे गावात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे.
डॉक्टरच्या संपार्कात आलेल्या 200 हुन अधिक जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार शिनोळी येथे सेवा बजावणारे 40 वर्षीय तरुण डॉक्टरना कोरोनाची बाधा झाली असून त्यानी शिनोळी,कुद्रेमानी,बाची,देवरवाडी आदि भागातील 200 हुन अधिक रुग्णांचा तपास केला होता.
सदर डॉक्टर तो पोजिटिव्ह झाल्याने तपास केलेल्या सर्व रुग्णांना चंदगडमध्ये नेऊन त्यांचे घश्याचे नमुने घेण्यात आले आहेत या शिवाय त्यांना एका ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले आहे.या डॉक्टरला बाधा झाल्याने या भागातील लोक भीतीच्या छायेखाली असून कोरोना कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका वाढला आहे.
शुक्रवारी सकाळी चंदगड मधून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस मधून संशयिताना चंदगडला नेऊन तपासणी नमुने घेण्यात आले व क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान त्या डॉक्टरांना कशी बाधा झाली त्याची हिस्ट्री काय याचा तपास सुरू आहे कोणत्या रुग्णांकडून बाधा झाली की काय याबाबत तपास सुरू आहे.कोविड काळात चंदगड भागातील डॉक्टर देखील कोरोना वारीयर्स म्हणून अविरत सेवा बजावत आहेत.