बेळगाव जिल्ह्यात रविवारी अकरा कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यामध्ये वीरभद्र नगर मधील एका 48 वर्षाच्या मृताचा समावेश आहे.
सध्या एकूण 74 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.रविवारी अनगोळ,वीरभद्र नगर,हनुमान नगर ,सुभाष नगर या भागात कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहराला आता कोरोनाचा विळखा पडला आहे.
अथणी,रायबाग,सौंदत्ती आणि बेळगाव जिल्ह्यात रविवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.स्थानिक बुलेटिन मध्ये उद्या साठी बेळगावचे 2411 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत 29 हजार लोक निरीक्षणाखाली असल्याचे म्हटले आहे.
ब्रेकिंग न्यूज-राज्यात रविवारी कोरोनाचा कहर-एका दिवसांत आढळले 1925 रुग्ण-एकूण रुग्ण झाले 23474 तर 13251 जण आयसोलेशन मध्ये गेल्या 24 तासांत 37 जणांचा मृत्यू- बेळगावात 11 नवीन रुग्ण बेळगावची एकूण संख्या 394 -5 जुलै राज्य मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1148061342218124&id=375504746140458