Friday, April 19, 2024

/

बेळगाव वगळता सर्वत्र आढळले कोरोना रुग्ण : 25,317 झाली राज्यांची संख्या

 belgaum

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्हा वगळता राज्यात अन्यत्र आणखी 1,843 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 30 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 6 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 25,317 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 401 झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यासाठी सोमवार दिलासादायक ठरला असून गेल्या 24 तासात एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 394 इतकी स्थिर आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 5 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 6 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,843 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25,317 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 14,385 असून यापैकी 279 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात शनिवारी 680 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 10,527 इतकी झाली आहे.

 belgaum

गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 30 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 401 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी गेल्या 24 तासात बेळगाव जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 981 रुग्ण – एकूण रुग्ण 10,561), बेळ्ळारी (99-1343), कारवार (81-435), आणि बेळगाव (0-394).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.