Thursday, March 28, 2024

/

बेळगावात गरज पुन्हा लॉकडाऊन करण्याची

 belgaum

बेळगावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिनोळी मार्गे, कोगनोळी मार्गे लोकांचे लोंढेच्या लोंढे बेळगावात येत आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबई बंगळुरू येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बेळगाव सीमावर्ती भागात असल्याने अनेक लोकांचे संपर्क मुंबई पुणे व कोल्हापूरशी येत आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर बंगळुरू मधून देखील अनेक जण परतत आहेत.

बेळगाव बाजारपेठेत, भाजीपाला मार्केटमध्ये, कापड मार्केटमध्ये, सराफी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यासाठी सदर भागातून लोक येत आहेत.मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे हे सर्रास चालू आहे. बेळगावात रविवार पेठ मध्ये येणाऱ्या लोकांची पण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी राज्यात जरी सरकारची भूमिका लॉक डाऊन करण्याची नसली तरी, बेळगाव प्रशासन, कलेक्टर, आणि लोकप्रतिनिधी यांनी बेळगावच्या जनतेचा विचार करून बेळगाव आठ दिवस तरी पूर्ण लॉकडाउन करण्याची गरज आहे.

कोरोनाचा विस्पोट जर बेळगावात झाला तर ते नंतर आवरणे अशक्य होईल. वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, पोलीस अधिकारी यांनाही कोरोणाची लागण झाली आहे. कॅम्प पोलीस ठाणे सील डाऊन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत बेळगावकर जनतेचे हित लक्षात घेऊन बेळगाव आठ दिवस तरी लॉकडाऊन करावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

 belgaum

बेळगावातील परिस्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे शासकीय यंत्रणा एवढ्या मोठया महामारीला तोंड देण्यासाठी पुरेशी आहे का?याचाही विचार करावा लागेल.जर का गावाला वाचवायचे असेल तर बेळगाव पूर्णपणे लॉक डाऊन करणे गरजेचे आहे.

लॉक डाऊनसाठी लोकांची मानसिकता तयार झाली आहे प्रशासनाला साथ द्यायला जनता तयार आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकेच्छा ओळखून अश्या वेळी लॉक डाऊन लागू करावे.

कोविड साठी यंत्रणा काम करत आहे मात्र साधनं कमी पडत आहेत. या परिस्थितीत सगळे मिळून काम करणे निकडीचे आहे.तात्पुरता मलम पट्टीपेक्षा गांभीर्याने कायमस्वरूपी उपचार करण्याची गरज आहे. बेळगाव प्रशासनाला याचा विचार करावाच लागेल.

2 COMMENTS

  1. लाँकडाउन हा पर्यार नव्हे ! तर जिल्हा सिल डाँउन करावा.जेने करुन व्यवसाय सुरळित चालतील.बाहेरी व्यवसाया बरोबर आँनलाइन व्यवहार करावा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.