Friday, April 26, 2024

/

बेळगाव शहर परिसरातला कोरोनाचा वाढला आकडा

 belgaum

बेळगाव शहरात शुक्रवारी 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ते हुक्केरी आणि अथणीचे आहेत.एकूण 116 कोरोनाबाधित रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आजवर 467 कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.त्यापैकी 346 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.आजवर नऊ व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला आहे.नऊ कोरोनाबाधित आय सी यु मध्ये उपचार घेत आहेत.

खासबाग, येळेबैल,बसवन कुडची,मल्लापुर, हुक्केरी,अडी, सौंदलगा,ऐनापूर,अथणी,रामदुर्ग अशी आज आढळलेल्या कोरोनाबाधितांची ट्रॅव्हल हिस्टरी आहे.एका कोरोनाबाधितांची इंटरनॅशनल ट्रॅव्हल हिस्टरी आहे.

 belgaum

या 15 रुग्णांत सदाशिवनगर हिंदवाडी खासबाग यळेबैल बसवणं कुडची आणि बेळगाव शहर मधील प्रत्येक एक तर याशिवाय बैलहोंगल 2, चिकोडी 3 अथणी 2 आणि हुक्केरी तालुक्यात 1 असे रुग्ण सापडले आहेत.

सकाळी दोन महिलांचे बळी गेले होते त्यामुळे मयतांची संख्या 7 वरून 9 झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.