आज 2 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 7 आणि राज्यात तब्बल 1,502 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 2 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 18,016 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 343 झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सहा पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. यापैकी पी -16940 या क्रमांकाचा 27 वर्षीय पुरुष केरळहून जिल्ह्यात आला आहे. पी -16961 आणि पी -16963 या क्रमांकांचे अनुक्रमे 35 व 52 वर्षीय दोन पुरुष महाराष्ट्र रिटर्न आहेत. त्याचप्रमाणे पी -16962 क्रमांकाचा 54 वर्षीय पुरुष गुजरात रिटर्न आहे. पी -16964 क्रमांकाचा 45 वर्षीय पुरुष सारीग्रस्त होता. या व्यतिरिक्त पी -17021 आणि पी -17022 या क्रमांकाचे अनुक्रमे 46 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालिका यांच्या ट्रॅव्हल हिस्टरीचा शोध घेतला जात आहे. यापैकी पी -16964 क्रमांकाच्या 45 वर्षीय सारीग्रस्त पुरुषाला ताप आणि श्वसनाचा त्रास होता. गेल्या 30 जून रोजी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने 1 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यातील दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 1 जुलै सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार दि. 2 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,502 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18,016 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 9,406 असून यापैकी 161 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात गुरुवारी 271 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 8,334 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 19 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 272 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी चामराजनगर वगळता उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 889 रुग्ण – एकूण रुग्ण 6179), मंगळूर ( 90-915), म्हैसूर (68-336) आणि बेळगाव (7-343).