कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
२३ आणि २४ जुलै रोजी शिवमोगा, चिक्कमंगळूर, हसन आणि कोडगु जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जरी केला आहे. याशिवाय २४ ते २६ जुलै दरम्यान अनेक किनारपट्टी जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२४ ते २६ जुलै दरम्यान किनारपट्टी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नडमध्ये वेगळ्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि म्हणूनच या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे, असे आयएमडी बेंगळूर चे संचालक सी.एस. पाटील यांनी म्हंटले आहे.