कित्तुर तालुक्यातील अवरादी येथे पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी साडेतीन किलो गांजा जप्त करून एकाला अटक केली आहे. मागील अनेक दिवसापासून संबंधित व्यक्ती गांजा विक्री करत असल्याचे आढळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोमाप्पा बसाप्पा पुरद वय 53 असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
डीसीआरबीच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक निगनगौडा पाटील डी के पाटील टि के कोळ्ची एस एम मंगनांवर जयराम हामनावर एम आय पठाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमाप्पाला अटक केली आहे. यासंबंधी कित्तूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवरादी येथील सोमप्पा याने गांजाचा साठा करून ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी अचानक छापा टाकून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा जप्त केला आहे तर या गांजाची किंमत 52 हजार पाचशे रुपये इतकी आहे.
या कारवाईमुळे गांजा विक्री करणाऱ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यापुढेही असे प्रकार करणाऱ्यावर कारवाई करू असे सांगण्यात आले. कितुर पोलिस पुढील तपास करीत आहेत. मागील अनेक दिवसापासून संबंधित व्यक्ती गांजा विक्री करत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढेही असे कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस सज्ज राहणार असल्याचेही सांगण्यात आले.