Monday, December 30, 2024

/

जनतेला जिल्हा रुग्णालयात प्रवेश बंदी

 belgaum

जनतेने जिल्हा रुग्णांलाकडे फिरकू नये बिम्स इस्पितळात सामान्य जनतेने जाऊ नये असा आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे.

जनतेचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून या शिवाय जिल्हा रुग्णालयात कोविड साठी सेवा बजावणाऱ्या डॉक्टर नर्स व इतर वैधकीय कर्मचाऱ्याना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे यासाठी बिम्स जिल्हा रुग्णालयात सामान्य जनतेला प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्ड तसेच इतर वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णा सोबत एक व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे सामान्य जनतेला गरज नसताना जिल्हा रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही.

या प्रवेश बंदिच्या आदेशाचे जो कुणी उल्लंघन करेल त्यांना आय पी सी 188 अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिलाय.

जिल्हा रुग्णालयात प्रवेश बंदीचा आदेश दिल्याने सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.