Friday, April 26, 2024

/

जिल्ह्यात हळूहळू आवळला जात आहे कोरोनाचा मृत्यु पाश!

 belgaum

कोरोनाने बेळगाव शहर आणि जिल्ह्याला घातलेला आपला मृत्यूचा पाश हळूहळू आवळण्यास सुरुवात केला असून जुलै पहिल्या आठवड्यात 7 इतका असलेला कोरोना मृत्यूचा आकडा गेल्या अवघ्या 19 दिवसात तिप्पटीहून अधिक म्हणजे 26 झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची तीव्रता जुलै महिन्याच्या प्रारंभापासून चिंताजनक पद्धतीने वाढली आहे. गेल्या गेल्या 1 ते 7 जुलै या आठवड्याभराच्या कालावधीत विविध ठिकाणी नव्याने 188 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे 7 जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 416 झाली होती आणि ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ होऊन ते 93 झाले होते. त्याचप्रमाणे 1 ते 7 जुलै या सात दिवसात मृत्यूचे प्रमाण देखील वाढवून 30 जूनपर्यंत दोन इतकी असणारी मृतांची संख्या 7 झाली होती. या काळात 316 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

एकंदर जिल्ह्यात 1 एप्रिल ते 7 जुलैपर्यंत म्हणजे तीन महिन्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढील आठ दिवसात 15 जुलैपर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या दुप्पटीने वाढून 14 झाली होती.

 belgaum
Death ratio
Death ratio belgaum district photo courtsay aab

यावेळी कोरोना बाधितांची संख्या 604 आणि ॲक्टिव्ह केसेसची संख्या 224 तर डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 366 झाली होती. पुढे अवघ्या या चार दिवसात म्हणजे दि.16 ते 20 जुलै या कालावधीत कोरोनाने तब्बल 12 जणांचा बळी घेतला आणि जिल्ह्यातील मृतांची संख्या 26 झाली. काल सोमवार दि. 20 जुलै रोजी जिल्ह्यातील मृतांचा आकडा 26 होण्याबरोबरच कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1079 झाली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 618 ॲक्टिव्ह केसेस होत्या तर 435 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

थोडक्यात सांगायचे झाल्यास कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या 1 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत बेळगाव जिल्ह्यात फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 16 ते 30 जून या कालावधीत मृतांची संख्‍या 2 झाली. पुढे 1 ते 7 जुलै या कालावधीत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 7 झाली होती. त्यानंतर 15 जुलैपर्यंत 14 आणि 20 जुलैपर्यंत 26 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. याचा अर्थ जुलै पहिल्या आठवड्यात असलेल्या मृतांच्या संख्येत 20 जुलैपर्यंत अवघ्या वीस दिवसात तिप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.