कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये रविवारी हिंडलगा येथील एका 58 वर्षीय इसमाचा समावेश आहे. हिंडलगा येथे मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पहाटे तीन तीस वाजता या इसमाचा मृत्यू झाला आहे. शनिवार दिनांक अकरा रोजी संबंधित इसमाच्या आईचा मृत्यू आजाराने झाला होता तर रविवारी 58 वर्षे इसमाचा मृत्यू झाला आहे.
गुरुवार दिनांक 9 रोजी श्वास घेताना त्रास होत असल्याने एका खासगी इस्पितळात उपचार घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याची लक्षणे कोरोना आजाराची जुळत असल्याने त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवार दिनांक 12 रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून यापुढे सुरक्षित अंतर ठेवूनच सर्व व्यवहार करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या व कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता दक्षता घेण्याची गरज आरोग्य खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या इसमाच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.