बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उचगांव विभागाच्या बेळगाव जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी उचगांव (ता. बेळगांव) येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात आज गुरुवार 25 जूनपासून दहावीच्या अर्थात एसएससीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेतली जात असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याच्या मदतीने सार्वजनिक शिक्षण खात्याने दहावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोरोना संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. बेळगाव तालुक्यात विशेष करून पश्चिम भागातील कांही गावांमध्ये अलीकडे बरेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज परीक्षेच्या पहिल्या दिवशी उचगांव परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील परिक्षा व्यवस्थेची तसेच कोरोना संदर्भातील उपाययोजनांची पाहणी केली.
सदर उचगांव परीक्षा केंद्रात अतवाड या कोरोनाबाधित गावातील सुमारे 30 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था परीक्षा केंद्रातील स्वतंत्र हॉलमध्ये करण्यात आली आहे. या पद्धतीने कोरोनाबाधित गावांमधील विद्यार्थ्यांसाठी इतर विद्यार्थ्यांपासून अलग अशी आसन व्यवस्था केली जावी, यासाठी सरस्वती पाटील गेल्या आठवडाभरापासून जिल्हा शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत होत्या. परीक्षा केंद्रात कोरोनाबाधित अतवाड गावांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याबरोबरच सरस्वती पाटील यांनी कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील कुद्रेमानी गावांतील उचगांव परीक्षा केंद्र असणाऱ्या सुमारे 60 विद्यार्थ्यांसाठी बसची सोय देखील करून दिली आहे. यामुळे पालकवर्गांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उचगांव दहावी परीक्षा केंद्राला दिलेल्या आपल्या भेटीप्रसंगी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी कोरोना संदर्भातील सोशल डिस्टंसिंग, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशन आदींची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे आर. आय. पाटील यांच्यासमवेत विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप देखील केले. याप्रसंगी उचगांव परीक्षा केंद्राच्या प्रमुखांसह पर्यवेक्षकवर्ग उपस्थित होता.