मराठा बँकेचे माजी अध्यक्ष एन वाय पाटील वय 86 वर्षे यांचे शनिवारी सकाळी अपघाती निधन झाले आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या पाटील यांना समोरून ट्रॅक्सने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.बेळगाव वेंगुर्ला रोडवर सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुळगा(हिं) येथील रहिवासी नारायण यल्लप्पा पाटील हे सकाळी फिरायला गेले होते त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्सगाडीचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्सने त्यांना जोराची धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
काकती पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.शनिवारी सायंकाळी चार वाजता सुळगा(हिं) त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
एन वाय पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर होते या शिवाय मराठा बँकेचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले होते. सहकार क्षेत्रातल एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते.त्यांच्या पश्चयात मूल मुली सुना नातवंड असा परिवार आहे.