बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द देते 80 हजारच्या कॅमेरा सह 19 लाखाचा भ्रष्टाचार झाल्या ची फिर्याद मारीहाळ पोलीस स्थानकात नोंद झाले आहे. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ही फिर्याद दिली आहे. यामध्ये पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
2018 साली हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची फिर्याद नुकतीच नोंद करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायत मध्ये ही घटना घडली आहे. ग्राम विकास अधिकारी यांनी हा सारा कारभार केला आहे. तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हा तक्रार देतात तेव्हा मात्र स्वतःची खुर्ची सांभाळावी की इतरांवर आरोप खालून मोकळीक व्हावे हा देखील प्रश्न आहे.
19 लाख रुपयांचा गफला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर यामध्ये काही सदस्यही त्यांना हातभार लावले असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत असाच प्रकार सुरू असतो याकडे तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि तक्रार करणारयांकडेही दुर्लक्ष अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी किती पैसे कमावले असतील हा देखील अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. खुद्य तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात दिली आहे. त्यामुळे हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून संबंधितांवर कोणती कारवाई करावी असा प्रश्न देखील पडला आहे.
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या विरोधात 19 लाख रुपयांचा दुरुपयोग केल्याची फिर्याद नोंद करण्यात आली आहे. या विरोधात भादवी 465 468 आणि 470 या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र याकडे संबंधित तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी यांनी साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या दुर्लक्ष पणामुळे भ्रष्टाचार होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. 80 हजार कॅमेरा यांसह एकूण 19 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे तक्रार देण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.