लॉक डाऊन मुळे शेतातील गलाटा फुलाचे पीक खराब झाल्याने नाराज शेतकऱ्याने गळफास लाऊन आत्महत्या केली आहे.बेळगाव तालुक्यातील हालगा येथे सोमवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली आहे.
मारुती भीमा बिळगुचे वय 63 रा.हालगा असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार मारुती यांनी उपजीविकेसाठी शेतात गलाटा फुलांचे पीक लावले होते लॉक डाऊन गलाटा पीक काढावं लागलं होतं त्यामुळे नुकसान झाले होते या निराशेतून त्यांनी आत्महत्त्या केली असावी अशी शक्यता आहे.सोमवारी रात्री आपल्या शेतवाडीतील घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.हिरेबागेवाडी पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या आठवड्यात बेळगाव तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली आहे लॉक डाउन मुळे शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढत आहे त्यामुळे ए पी एम सी ने आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.