एसीबीने मंगळवारी सकाळी वजन मापन खात्याच्या सहाय्यक नियंत्रकाच्या घरावर घातलेल्या धाडीत मोठे घबाड सापडले आहे.कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता धाडीत सापडली आहे.एसीबी पोलीस स्थानकात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुभाष सुरेंद्र उप्पार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेळगावात मंगळवारी सकाळी ए सी बी पोलिसांनी धाड टाकली होती त्यानंतर चौकशी सुरू केली होती. सायंकाळी पर्यंत तपासाअंती पोलिसांनी कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे.
2720 चौरस फुटाचा प्लॉट,रुक्मिणी नगरमध्ये आलिशान ड्युप्लेक्स बंगला,कुमारस्वामी ले आउटमध्ये प्लॉट,337 ग्रामचे सोन्याचे दागिने,1511 ग्राम वजनाच्या चांदीच्या वस्तू,5151672 रु च्या विविध बँकेतील ठेवी,पाच लाख रु चे एलआयसी बॉण्ड एसीबीच्या धाडीत सापडले आहेत अशी माहिती एसीबी विभागाकडून देण्यात आली आहे.
बेळगावात सकाळी सकाळी एसीबी ने धाडसत्र सुरू केले आहे.एसीबीच्या चार पथकांनी एकाच वेळी धाड टाकून तपासाला प्रारंभ केला होता वजन माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक सुभाष उप्पार यांचे निवासस्थान,भाडोत्री घर ,कार्यालय,त्यांच्या पाहुण्याचे बसवणं कुडची येथील घर अशा चार ठिकाणी तीस एसीबी कर्मचाऱ्यांनी धाड टाकेली होती.
कार्यालय आणि घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात एसीबी अधिकारी गुंतले आहेत.एसीबी एस पी बी एस न्यामगौडर यांच्या नेतृत्वाखाली धाड घालण्यात आली आहे.एक डीएसपी ,सात इन्सपेक्टर आणि वीस कर्मचारी यांचा धाड घातलेल्या पथकात समावेश होता.