चेन्नईहून दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या कित्तूर तालुक्यातील एका खेड्यातील विद्यार्थ्याला आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.हा मुलगा चेन्नई येथे आपल्या पाहुण्यांचतील घरी गेला होता.लॉक डाऊनमुळे तो तिथेच अडकून पडला होता.
लॉक डाऊन संपल्यावर नियमांची पूर्तता करून तो मुलगा कित्तूर तालुक्यातील आपल्या गावी आला.दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या या मुलाने गावात फेरफटका देखील मारला.सलूनमध्ये जावून केसही कापून घेतले.
पण आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन त्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले आहे.त्यामुळे सोळा वर्षाच्या या विद्यार्थ्याला आता जिल्हा रुग्णालयात राहावे लागणार आहे.आता तो दहावीची परीक्षा कशी देणार असा प्रश्न पडला आहे.
सरकारने दहावीची परीक्षा 26 जून ते जुलै पर्यंत घेण्याचे ठरवले आहे परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासही केला आहे.दहावीच्या विध्यार्थ्याना ऑनलाइन मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे.
लॉक डाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी परीक्षेसाठी आपापल्या गावी येत आहेत अश्या परिस्थितीत पर गावाहून आलेल्या विध्यार्थ्याना केवळ संशयावरून जर दवाखान्यात दाखल केले तर त्या विद्यार्थ्यांनी दवाखान्याच्या वातावरणात अभ्यास कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला आहे.