बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे. या चार महाराष्ट्र रिटर्न रुग्णांमुळे आज गुरुवार दि. 25 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 316 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पी -10322 क्रमांकाचे आठ वर्षीय बालक, पी -10323 क्रमांकाची 29 वर्षीय महिला, पी -10324 क्रमांकाची 32 वर्षीय महिला आणि पी -10325 क्रमांकाच्या 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात आले आहेत. दरम्यान, आज गुरुवारी दिवसभरात पी -974, पी -2270, पी -4066, पी -4550, पी -6270 आणि पी -7391 या क्रमांकाच्या सहा रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये बेकायदेशीररित्या महाराष्ट्रातून जिल्ह्यात आलेल्या सदाशिनगर येथील “त्या” महिलेचाही समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह केसेस 20 असून आतापर्यंत 295 जणांना कोरोना मुक्त झाल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.