गोमांस वाहतूक करणारी चार वाहने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून हिरेबागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिली.गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता हिरेबागेवाडी टोल नाका येथे गोरक्षक कार्यकर्त्यांनी अडवली असता त्या वाहनातून गोमांस वाहतूक होत असल्याचे समजले.ही चारही वाहने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिली.
गोमांस वाहतूक करणारी वाहने नेहमी आपल्या मार्गात बदल करून वाहतूक करत आहेत.हिरेबागेवाडी येथे पकडण्यात आलेली चार वाहने वंटमुरी येथून निघून कित्तूर मार्गे गोव्याला जाणार होती. गोमांस वाहतुक करणाऱ्या चार वाहनांचा क्रमांक KA22 C 3695 GA08 V8715 KA22 D 1834 KA23 A 5615 असा आहे. गेल्या पंधरा दिवसामधे हि चौथी सर्वात मोठी कार्यवाही बजरंग दलाचा कार्यकरत्यानी केली आहे.
गोहत्या करून गोमांस गोव्याला पाठविण्यात येते.बेळगावहून गोवा जवळ असल्याने आणि तेथे गोमांसाला मागणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेकायदा गोमांस वाहतूक केली जाते.रात्रीच्यावेळी चोर्ला मार्गावर वाहतूकही कमी असते त्यामुळे बेकायदा गोमांस वाहतूक करणारी वाहने या मार्गाने गोव्याला जातात.
गेल्या पंधरा दिवसांपासून बजरंग दल कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतूक करणारी वाहने ठळकवाडी येथील बिग बझार,कित्तूर चन्नमा चौक येथे अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.काही दिवसांपूर्वी गोमांस वाहतूक करणारे वाहन थांबवून अज्ञात व्यक्तींनी ते वाहन पेटवून दिले होते.