Saturday, April 27, 2024

/

दहावीचे वेळापत्रक जाहीर कधी आहे कोणता पेपर

 belgaum

कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने (केएसईईबी) राज्यात येत्या 25 जून ते 4 जुलै 2020 दरम्यान घेतल्या जाणाऱ्या दहावी (एसएसएलसी) परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले आहे.

सदर परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दि. 25 जून : द्वितीय भाषा इंग्रजी कन्नड (सकाळी 10.30 ते दुपारी 1.30) वाजेपर्यंत. शुक्रवार दि. 26 जून : प्रमुख विषय एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (सकाळी 10.30 ते 01.45 वाजेपर्यंत), इंजिनिअरिंग ग्राफिक्स (दुपारी 2 ते सायं. 5.15 वा.). एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग (सकाळी 10.30 ते 1.45वा.). एलिमेंट्स ऑफ कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स (सकाळी 10.30 ते 01.45 वा.).

शनिवार दि. 27 जून : गणित, सायकॉलॉजी (सकाळी 10.30 ते दुपारी 1.45 वा.). सोमवार दि. 29 जून : सायन्स अँड पॉलिटिक्स (सकाळी 10.30 ते 1.45 वा.).कर्नाटकी, हिंदुस्तानी संगीत (दुपारी 2 ते सायं. 5 वा.)

 belgaum

बुधवार दि. 1 जुलै : सोशल सायन्स (सकाळी 10.30 ते 1.45 वा.). गुरुवार दि 2 जुलै : प्रथम भाषा कन्नड, तेलुगू , हिंदी, मराठी, तामिळ, उर्दू, इंग्लिश, संस्कृत (सकाळी 10.30 ते 1.45 वा.). शुक्रवार दि. 3 जुलै : तृतीय भाषा हिंदी, कन्नड, इंग्लिश, अरेबिक, पर्शियन, उर्दू, संस्कृत, कोंकणी, तुळू (सकाळी 10. 30 ते 1.30 वा.). शनिवार दि 4 जुलै : प्रॅक्टिकल आणि मौखिक परीक्षा जेटीएस परीक्षार्थींसाठी.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंग करून घ्यावे लागेल. सॅनिटायझरने हात स्वच्छ धुऊन मास्क वापरावा लागेल. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा सुरू होण्याआधी एक तास सकाळी 9.30 वाजता हजर राहणे अनिवार्य असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.