बेळगाव येथे अडकून पडलेल्या आणि कवारांटाइन मधून मुक्त झालेल्या राजस्थान येथील कामगारांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्याचे ही ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बेळगावात समाज कल्याण खात्याच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या राजस्थानमधील कामगार व विद्यार्थ्यांची सुटका लवकरच होणार आहे. एकदाच कवारनटाइन मुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संबंधित कामगारांना आता त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रशासन मदत करून राहिले असून यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.
बेळगावसह हुबळी, धारवाड, दावणगेरे, हावेरी आणि इतर अनेक राज्यांसह राज्यातील विविध भागांमधून लॉरीद्वारे सोडण्यात येत आहे. यासाठी कर्नाटक राजांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनेकांच्या आरोग्याची तपासणी करूनच नंतर त्यांना जाऊ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यांचे मुदत संपल्यानंतर त्यांना विशेष बस सेवा देऊन घरी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बेळगाव येथील रामदेव हॉटेल जवळील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या विद्यार्थी तसेच कामगारांना विलगीकरण कक्षा ठेवण्यात आले होते. या सार्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळेच त्यांना जाण्याची मुभा प्रशासनाने करून दिली आहे.