Saturday, November 16, 2024

/

राज्यातील “कोरोना” संख्या 589 : बेळगावचे 5,118 नमुने प्रयोगशाळेत

 belgaum

गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात आणखी 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शुक्रवार दि. 1 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 589 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे रायबाग येथे 3 रुग्ण आढळून आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे आकडा 72 इतका वाढला आहे. उपचारांती पूर्णपणे बरे झाले असल्यामुळे राज्यात एकूण 251 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 1 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 6,420 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 3,893 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 58 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 1,238 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 1,231 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,118 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 72 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 3,367 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 61 आहेत. त्याचप्रमाणे 1,654 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 10 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

*राज्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 589*
दरम्यान, राज्याच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि 1 मे 2020 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 589 इतकी झाली आहे. यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला असून 251 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल गुरुवार दि. 30 एप्रिल सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 1 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 24 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील नव्याने आढळून आलेल्या आलेल्या 24 कोरोना बाधित रुग्णांमध्ये मंड्या येथील 8, दावणगेरे येथील 6, रायबाग येथील 3, मंगळूर व कलबुर्गी येथील प्रत्येकी 2, तसेच विजयपुरा, चिकबळ्ळापूर व हुबळी – धारवाड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे आढळून आलेल्या रूग्णांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. पी-574 क्रमांकाचा 55 वर्षीय पुरुष पी-576 क्रमांकाचा 50 वर्षीय पुरुष आणि पी-575 क्रमांकाची 30 वर्षीय महिला हे रायबागचे तिघेही जण पी-301 क्रमांकाच्या (सेकंडरी कॉन्टॅक्ट) रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाले आहेत.

आजपर्यंत राज्यात बेंगलोर येथे सर्वाधिक 141 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बेंगलोर खालोखाल म्हैसूर (88) आणि बेळगाव (72) जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण 20 जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.